₹350.00
“जर्मनीतीन लिपझिग नावाच्या शहरात १९२० साली ज्यू कुटुंबात जन्मलेला ’एडी जाकु’. तो स्वतःला नेहमीच प्रथम जर्मन आणि नंतर ज्यू समजत असे. त्याला जर्मनीचा विलक्षण अभिमान होता; पण नोव्हेंबर १९३८ मध्ये हिटलर च्या ज्यू विरुध्दच्या क्रुरतेने त्याला झोडपलं गेलं, त्याला अटक करून छळछावणीत त्याची रवानगी झाली आणि त्याला जर्मनीचा वाटणारा अभिमान हा भूतकाळ झाला. त्याच्या पुढच्या सात वर्षांत, कल्पना करता येणार नाही असे भयकारी प्रसंग त्याच्यावर ओढवले; प्रथम बुखेनवाल्डमध्ये आणि नंतर आउश्वित्झमध्ये मृत्युयात्रेची वाट चालत असताना तो आपल्या कुटुंबाला मुकला, त्याचे मित्र त्याने गमावले आणि अखेर त्याचा देशही त्याचा उरला नाही.
जीवनाची किंचितही हमी नसताना आणि अनेक भयानक प्रसंग आयुष्यात ओढवले असताना एडी बचावला. सरतेशेवटी त्याने शपथ घेतली की, रोज हसतच दिवस जगायचा. आपल्याला जे आयुष्य उमजलं ते तो सर्वांना समजावून सांगतो आणि जितकं चांगलं आयुष्य जगता येईल तितकं जगतो. त्यानं अपार दु:ख भोगलं असलं तरी तो या पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस आहे असं स्वत:ला समजतो.
१०१ वर्षांचा एडी या पुस्तकांत सांगतो, “”दुष्टांच्या नजरेला नजर कशी द्यायची हे मला ठाऊक आहे. मानवजातीतील सर्वात नीच प्रवृत्ती मी पाहिली आहे. मृत्यूच्या छावण्यांतील भयकारी चाळे, माझे आणि माझ्या जातिबांधवांचे आयुष्य संपवण्याच्या नाझींच्या प्रयंत्नांचा मी साक्षीदार आहे. मी शेवटी एक गोष्ट शिकलो, तुम्ही घडवू शकलात तर तुमचं जीवन सुंदर असतं. आनंद ही अशी एक गोष्ट आहे तिची निवड आपण करु शकतो. काय निवडायचं हे तुमच्यावर आहे.””
प्रसंगी हृदय विदीर्ण करणारी, तरीही अत्यंत समर्थ आणि आशादायक अशी ही स्मृतिकहाणी आहे. ‘भोवती अथांग काळोख दाटला असला तरी आनंद शोधता आणि मिळवता येतो’ हाच या प्रेरणादायी सत्य जीवनकथेचा संदेश आहे.”
There are no reviews yet.
© हे कौस्तुभ पुस्तकालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
Be the first to review “पृथ्वीवरील सर्वांत आनंदी माणूस”