₹400.00
“भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्रायल-पॅलेस्टाइन, रशिया-युक्रेन असे देशादेशांमधील संघर्ष. सार्या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद. पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणार्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या. भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत. जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी सल्लामसलत करणार्या संदीप वासलेकरांचे भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे अप्रतिम पुस्तक.
देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक संपन्नता, दळणवळणाची आधुनिक माध्यमं, बाजारपेठ, रुंद रस्ते असं नसून देशाची एकता, मन:स्वास्थ्य, निसर्गाशी समतोल राखून त्याचा जरुरीपुरता वापर असा विकास व्हायला हवा; पण आपण डोळ्यांवर पट्टी बांधून फक्त आर्थिक उत्पन्नाच्या मागे धावत आहोत आणि तेसुध्दा अल्पशा लोकांच्या फायद्यासाठी ! अनेक देशांच्या प्रमुखांशी काम करतानाचे लेखकांचे अनुभव आणि त्यांचे वैचारिक लिखाण मराठी तरुणांना क्षितिजापलीकडचा विचार करायला, जगाचे आणि आपल्या देशाचे नवे भान ठेवायला प्रवृत्त करते.
मानवाच्या केवळ समस्या अथवा विदारक चित्र न दाखवता त्यावर मात करण्यासाठी सामान्यांनी काय केले पाहिजे, हे या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या चितारले आहे. भारताला एका समृध्द आणि महान देशाची निर्मीती करण्याचा ध्यास तर प्रत्येक भारतीयाचा आहेच परंतु ते करण्यासाठी नक्कि कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा जेणेकरुन सामान्यातल्या सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल याबाबत लेखकाने सोप्या शब्दांत या पुस्तकांत मांडले आहे.
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा हा एक क्रांतिकारी दस्तऎवज आहे असं देखील म्हणू शकता. आपल्या सर्वांच्याच आयुष्याला दिशा देणारे हे अनुभव म्हणजेच एका दिशेचा शोध.
“
There are no reviews yet.
© हे कौस्तुभ पुस्तकालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
Be the first to review “एका दिशेचा शोध”