₹350.00
“कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या उत्तम पुस्तकात ग्रँट हे चौथ्या महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या उपयोगाविषयी सांगताहेत. ते तत्व म्हणजे इतरांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
हे पुस्तक यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं. शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रारूपं सादर करतं.
‘प्रत्येकाने आपापले हित जपले, स्वतः पुरते बघितले की, सर्व काही उत्तम होईल ‘ या सर्वसामान्यपणे जगभरात प्रचलित असलेल्या विचाराला आपण दुदैवाने हमखास बळी पडतो. आपल्या याच आजवरच्या पारंपरिक व गुळगुळीत झालेल्या ‘यशप्राप्ती च्या कला व पद्धती’ यांना छेद देणारे हे पुस्तक आहे.
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्याचे हात (दातृत्व) घ्यावे’ विंदा करंदीकरांची ही कविता प्रसिद्ध आहे. दातृत्व आपल्याला आपल्याच यशासाठी पूरक असते. आपल्या रोजच्या जीवनातील – आपण आपली कारकीर्द कशी घडवतो, आपले स्नेही, संबंधी यांच्याशी कसे वागतो, मुलांना कसे वाढवतो यावरून आपण आपल्या जीवनाला आकार देत असतो. याचविषयीचे अनेक प्रसंग हे पुस्तक पुरावे म्हणून देते. दातृत्वाविषयीचे ‘मैलाचा दगड’ ठरावे असे महत्वपूर्ण पुस्तक आहे. जगातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांविषयी ओळख करून देऊन ही गोष्ट आपल्याला सिद्ध करून दाखवते की ‘इतरांनाही हात देऊन आपल्यासोबत वर घेऊन येणे हा यशाच्या शिडीचा अगदी वरच्या पायरीवर पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.’
स्वत: पुरते हित जोपासून यश मिळवण्याच्या चुकीच्या विचारापेक्षा परस्पर सहकार्य, आदानप्रदान यांच्या साहाय्याने स्वत:चे ध्येय निश्चितपणे साधून देणाऱ्या नवा यशाचा मार्ग दाखवणारे विश्वासार्ह संशोधीत पुस्तक.
वॉर्टन बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या ग्रँट यांनी आपल्या सखोल संशोधनाचा वापर करत, हॉलिवूड ते इतिहासातील यशस्वी कथांच्या माध्यमातून हे दाखवून दिलंय की, इतरांना मदत केल्यानं आपल्याला अधिकाधिक यश मिळत राहतं.
लेखक परिचय :
ऍडम ग्रँट हे वॉर्टन स्कूलमधील सर्वांत कमी वयाचे प्राध्यापक आहेत. गूगल, मर्क, पिक्सार, फेसबुक, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकन सेना व नौसेना अशा अनेकांना त्यांनी सल्ला दिला आहे. सर्वाधिक लोकप्रिय प्राध्यापकांपैकी एक या पुरस्काराने बिझनेस वीकतर्फे ते सन्मानित झाले आहेत. चाळीस वर्षांखालील जगातील सर्वश्रेष्ठ बिझनेस प्रोफेसर्समध्ये ग्रँट यांचा समावेश होतो.”
There are no reviews yet.
© हे कौस्तुभ पुस्तकालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
Be the first to review “गिव्ह एण्ड टेक”