₹400.00
“शिवाजी महाराज कसे बोलायचे ? शिवराज्याभिषेकाचे महत्व आणि गरज नक्की काय होती ? शिवरायांवर विषप्रयोग नक्की झाला होता का ? आग्र्याहून सुटकेत महाराजांनी नक्की पेटाऱ्यातूनच पलायन केले होते का ? शायिस्ताखानावरील हल्ल्यात महाराजांनी काय काय युक्त्या वापरल्या होत्या ? महाराजांच्या दरबारातील कवी भूषण नक्की कोण होते ? शिवकालातील फारसी साधनांतून शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि राजकारण कसे दर्शवले होते ? शिवकालातील कांचनबारीची लढाई किती आणि कशी महत्वाची आहे ? आग्रा ते राजगड महाराज नक्की कुठल्या मार्गाने आले होते ? शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील राजकिय, सांस्कृतिक व कौटुंबिक फरक ? आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्वाची रहस्यकथा. अशा एकुण २५ विविध विषयांवर महाराजांच्या आयुष्यातील विविध घटनांची माहिती देणारे अप्रतिम ऎतिहासीक पुस्तक.
महाराजांच्या अनेक समकालिन ग्रंथांचा तसेच इंग्रज, पोर्तुगिज, डच, फ्रेंच या परकिय सत्तांच्या पत्रव्यवहाराचा अभ्यास करुन हे पुस्तक प्रसिध्द इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी लिहिलेले आहे. फक्त एवढेच नाही तर इतर इतिहासकारांनी केलेले संशोधन, उपलब्ध बखरी, फारसी साधने, पोर्तुगिज साधने, समकालिन मोगल इतिहासकारांनी लिहिलेल्या बखरी, शिवकालीन दानपत्रे अशा दुर्मीळ साहित्याचा देखील पगडींनी या पुस्तकातुन अभ्यास केला आहे.
या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरुनच तुम्हाला या पुस्तकाचा आवाका कळेल.
१. शिवाजीमहाराज आणि शायिस्ताखानावरील हल्ला
२. शिवरायांची आग्रा-भेट
३. शिवाजी महाराज आणि पेटाऱ्याची कथा
४. शिवराज वचनामृत
५. महाराजांचे बोलणे कैसे
६. शिवाजीमहाराज : स्वतःच्या शब्दांत (राजस्थानी पत्रे )
७. वदले छत्रपती
८. समकालीन फारसी साधनांतून शिवाजीमहाराज
९. शिवशाहीतील एक उद्बोधक प्रकरण
१०. शिवराज्याभिषेकाचे महत्त्व
११. शिवरायांचा महत्त्वपूर्ण राज्याभिषेक
१२. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा आविष्कार : शिवराज्याभिषेक
१३. शिवराज्याभिषेक व जदुनाथ सरकार
१४. कवी भूषण
१५. कांचनबारीची लढाई : १७ ऑक्टोबर १६७०
१६. सरंजामाकडून स्वतंत्र राज्याकडे विस्तारत जाणारी क्षितिजे
१७. मोगल घराण्यातील अश्वत्थामा: औरंगजेब
१८. मोगल-मराठा संबंध
१९. शिवरायांवर विषप्रयोग ?
२०. धनाजी जाधवाचा पराक्रम
२१. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध – साधन व स्वरूप
२२. आग्रा ते राजगड : पण कोणत्या मार्गाने ?
२३. शिवजीवनातील एक रहस्यकथा
२४. शिवाजीमहाराज व औरंगजेब
२५. शिवनेरीची कहाणी”
There are no reviews yet.
© हे कौस्तुभ पुस्तकालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
Be the first to review “छत्रपती नि त्यांची प्रभावळ”