₹320.00
“तुम्हाला जर कोणी सांगितलं की झाडांना भावना असतात, त्यांना यातना होतात, आपल्या प्रजातीच्या सदस्यांबरोबर ते संभाषण साधतात, स्वतःच्या पाल्यांना ते आधार देतात.. या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील का ?
हो ! झाडं आपसात बोलतात, ते आपल्याकडील माहिती इतरांना पोहोचवतात! ते रडतात आणि आपल्या लेकरांची काळजी ही घेतात… जखमी झाडाची काळजी घेऊन त्याला दुरुस्त करतात.. आपल्याला नवल वाटेल की झाडांनाही स्मरणशक्ती असते. त्यांना ऐकू येतं आणि त्यांची एक भाषा ही असते. ते मित्रमंडळींचा गोतावळा जमा करतात, त्यांना रंग दिसतात. एखाद्या झाडावर काही संकट आले असेल तर ते झाड इतरांसाठी ही माहिती देते. सगळी झाडं या मुळे येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात. आवश्यक ते जैवरासायनिक बदल स्वतःमध्ये घडवून आणतात. वेगवेगळ्या झाडांच्या वेगवेगळ्या तऱ्हा ! कोठे मैत्री तर कोठे शत्रुत्व! जसे सहजीवन तसे परजीवन!
चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला विचारा चंदनाच्या शेतीत कडुलिंब का लावतात? तर तो हेच सांगेल की हे सहजीवन त्यांना मानवते. अर्थात त्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. मित्रांमध्ये ते खुश राहतात. १९८० मध्ये डेहराडून जवळ चंद्रबनी मध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची इमारत “”साल”” (समूहात वाढणारे झाडं) जंगलाला साफ करून उभी केली गेली. या संस्थेच्या आवारात एकटी राहिलेली “”सालची”” झाडं एक एक करून मरू लागली. आपल्या सजातीयांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांचा अंत झाला, पण हे त्यांना कसं कळलं? त्यांची संभाषण यंत्रणा कशी आहे.
झाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच. पण वोह्ललेबेन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पद्धतीने या पुस्तकातून मांडली आहे. अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.
जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.”
There are no reviews yet.
© हे कौस्तुभ पुस्तकालयाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
Be the first to review “द हिडन लाईफ ऑफ ट्रीज”