WordPress WooCommerce Themes

Need help? Whatsapp us:

+91 9930039728

मॅडम कमिशनर

399.00

भाषा : मराठी
पुस्तक श्रेणी :आत्मचरित्र
प्रकाशन :Pan Macmillan
पाने : 288

Summary of the Book :

“भारतातील एका प्रामाणिक, निडर आणि सिस्टीम समोर धडाडीने उभी राहिलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याची अतुलनीय, संवेदनशील, वादग्रस्त आणि खळबळजनक गाथा.

भारताच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीमधून पदवी प्राप्त करणाऱ्या मीरां चढ्ढा बोरवणकर या १९८१ च्या बॅचमधील एकमेव महिला. अकादमीतून बाहेर पडल्यावर आपल्या कारकिर्दीत कित्येक संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणांची एक लांबलचक मालिका त्यांनी अनुभवली. भ्रष्टाचार आणि भेदभाव यांना तोंड देत, विविध गुन्ह्यांसाठी एकत्रितपणे लढा देत असताना त्यांनी आपल्या आंतरिक सचोटीशी कधीही तडजोड केली नाही. अंगभूत कौशल्यांबरोबरच सातत्यपूर्वक प्रयत्नांमुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस प्रमुख, तसेच पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या. त्यांनी ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ आणि मुंबईच्या क्राईम ब्रँचमध्ये वरिष्ठ भूमिकाही सांभाळल्या. अखेरीस ‘ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’, ‘नॅशनल क्राईम अँड रेकॉर्ड ब्युरो’च्या महासंचालक म्हणून त्या निवृत्त झाल्या.
कायद्याचे राज्य स्थापन करण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या मीरां, या देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेवर टीका करण्यास कधीही डगमगल्या नाहीत; प्रसंगी देशातील वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही त्यांनी थेट आव्हान दिले. भारतीय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आपल्या छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीत मीरां यांनी कित्येक खळबळजनक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. जळगाव सेक्स स्कँडल, दागिन्यांच्या पेढीवरील लूट, महामार्गावरील दरोडे, जातीय दंगली, क्रूर हत्या, सामूहिक बलात्कार, बंदरातील चोरी, आर्थिक फसवणूक, इथपासून ते छोटा राजन, दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी त्यांची चकमक झडली. राज्य कारागृह प्रमुख या नात्याने, संजय दत्तचा तुरुंगवास, तसेच अजमल कसाब आणि याकुब मेमन यांच्या फाशीची देखरेख करताना त्यांनी आक्रमक प्रसारमाध्यमे आणि सरकारी दबाव यांचा अविचलपणे सामना केला आणि त्याद्वारे खाकी परिधान करण्याचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने, दोन्ही अधोरेखित केले. चित्तथरारक अनुभूती देणाऱ्या, अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या आणि अखंड प्रेरणा देणाऱ्या या प्रामाणिक ‘मॅडम कमिशनर’चा हा जीवनपट म्हणजे भारतीय पोलीस सेवेतील एका महिला अधिकाऱ्याची संस्मरणीय यात्रा आहे.

Reviews

Be the first to review “मॅडम कमिशनर”

Your email address will not be published. Required fields are marked

Rate Your Satisfaction*

You have to be logged in to be able to add photos to your review.

There are no reviews yet.

× Available from 07:00 to 22:00